top of page

नवोदित अभिनेत्रीचा भरस्त्यात गोंधळ, महिला पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा

हॉटेलचालकाशी वाद झाल्याने भर रस्त्यात नवोदित अभिनेत्रीने गोंधळ घातल्याची घटना घडली. ही घटना वडगाव शेरी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या वेळी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाच्या बोटाचा अभिनेत्रीने चावा घेतला. सरकारी कामात आणणे तसेच दुखापत केल्या प्रकरणी तिला अटक करणात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक यांनी दिली.

ree

मिळालेल्या माहितीनुसार काकुली बिश्वास (वय 28, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) ही नवोदित अभिनेत्री असून तिने काही वेबसिरीजमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती मुंबईहून पुण्यात कामानिमित्त आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हॉटेलमधील खोली ऑनलाइन बुक केली होती. मात्र, हॉटेलमधील सुविधा तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने बुकिंग केलेले पैसे परत मागितले. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने पैसे परत देण्यास नकार दिल्याने तिने हॉटेलमधील कर्मचार्‍यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळातच दामिनी पथकातील महिला पोलीस तेथे गेल्या. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र ती एकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हॉटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या काकुलीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्या वेळी दामिनी पथकातील पोलिस कर्मचारी परवीन शेख यांच्याशी वाद घालून झटापट केली. तिने शेख यांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात आणणे तसेच दुखापत केल्या प्रकरणी काकुलीला अटक करणात आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page