top of page

शहीद जवान रामेश्वर काकडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर : छत्तीसगड येथे कर्तव्य बजावताना बार्शी (जि. सोलापूर) येथील जवान रामेश्वर काकडे शहीद झाले. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री दीड वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ree

जवान रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी होते. २०१२ मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. नुकतेच ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. छत्तीसगडमधील रायपूर येथे बुधवारी पहाटे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना काकडेंनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला.

गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बार्शीत दाखल झाले. त्यानंतर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला. रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जवान रामेश्वर काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.


 
 
 

Comments


bottom of page