top of page

जेसीबीमधून गुलालाची उधळण; १६ जणांविरुध्द गुन्हा

कोल्हापूर :कागल समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड (९) जुलै रोजी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते रमेश तोडकर (लिंगनूर दुमाला) यांची सभापतीपदी तर संजय घाटगे गटाच्या मनीषा सावंत (बानगे) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांना, 'मिरवणुक काढु नये' अशी सी.आर.पी.सी.149 प्रमाणे नोटीस बजावणी केली होती. मात्र त्याचे उलंघन करत उपसभापती मनिषा सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात रथातून मिरवणूक काढत जेसीबीमधून गुलालाची उधळण केली.

या प्रकरणी नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, बानगेचे उपसरपंच लंबे, जेसीबी मालक नेताजी पाटील यांच्यासह १६ जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली आहे.



 
 
 

Comments


bottom of page