top of page

काबूलमध्ये बॉम्बस्फोट; २० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. बुधवारी सांयकाळी झालेल्या स्फोटात २० जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा मशिदीमध्ये नमाज अदा केली जात होती. त्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली होती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.



 
 
 

Comments


bottom of page