top of page

नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर : नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पांडुरंग गोडसे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

शासनाने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे आदेश काल निर्गमित केलेले होते. त्यानुसार सन 2016 च्या बॅच चे सनदी अधिकारी असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली

तर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची बदली मुंबई येथील महात्मा फुले जन आरोग्य सोसायटी आणि राज्य आरोग्य विमा सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे


Comments


bottom of page