top of page

Video:अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर प्रदर्शित

‘सैराट’, ‘फँड्री’ असे सुपर हिट चित्रपट मराठी देणाऱ्या नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट ‘झुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘झुंड’ चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे कलाकार देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे.



Comments


bottom of page