top of page

गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाही, असं... ; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं मत

टी २० स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण होणार ? या बद्दल सर्वानाच उत्सुकता आहे. आजी माजी क्रिकेटपटूंनी कुणाला कर्णधारपद द्यावं?, याबाबतची मतं व्यक्त केली आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावं आघाडीवर असतानाच आता माजी क्रिकेटपटू आशिष नेहराने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भारताचा पुढचा कर्णधार एक गोलंदाज असावा, असं सांगत जसप्रीत बुमराहचं नाव सुचवलं आहे. “गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाही, असं कोणत्याच पुस्तकात लिहिलेलं नाही.”, असंही आशिष नेहराने क्रिकबजशी बोलताना सांगितलं.

ree

भारताने मला कर्णधारपद न देता आधीच मोठी चूक केली आहे. आता ही चूक पुन्हा करू नये.”, असं आशिष नेहराने हसत सांगितलं. “कर्टनी वॉल्श, वसीम अक्रम, वकार यूनिस कर्णधार होते. तर एक गोलंदाज कर्णधार का होऊ शकत नाही? रोहित शर्मा व्यतिरिक्त केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचं नाव आघाडीवर असल्याचं मी ऐकलं आहे. जसप्रीत बुमराह प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळतो. दुसरीकडे गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाही असं कुठे लिहिलं नाही”, असं आशिष नेहराने सांगितलं.



 
 
 

Comments


bottom of page