top of page

बटलरची तुफानी खेळी; ८ षटकार, ११ चौकारांसह १२४ धावा

ree

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज (रविवार) झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आयपीएलमधील पहिले शतक ठोकले. अवघ्या ५६ चेंडूत बटलरने शतक केले. त्याने ६४ चेंडूत ८ षटकार, ११ चौकारांसह १२४ धावा केल्या. बटलरच्या या तुफानी खेळीमुळे राजस्थानने हैदराबादसमोर २० षटकात ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला.


 
 
 

Comments


bottom of page