top of page

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या 26 व्या फेरीअखेर जयश्री जाधव 18901 मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती.

ree

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

फेरीनिहाय निकाल खालील प्रमाणे...

फेरी जयश्री जाधव सत्यजीत कदम

1 4856 2712

2 5515 2513

3 4928 2566

4 3709 3937

5 3673 4198

6 4689 2972

7 3632 2431

8 2981 3505

9 2744 2937

10 2868 3794

11 2870 2756

12 3946 2908

13 4386 2432

14 3756 2669

15 3788 2056

16 3638 3847

17 2795 3488

18 3948 3189

19 3259 2974

20 4366 3074

21 3452 3662

22 3529 3226

23 3337 2531

24 5337 2830

25 2755 2949


 
 
 

Comments


bottom of page