top of page

Video : जयंत पाटील यांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटकोपर येथे 'राष्ट्रवादी चषक' ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. राजकारणाच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या जयंत पाटलांनी क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ree

या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याठिकाणी उपस्थित राहिलो असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा उत्साह पाहून मला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि मग मीही मैदानात उतरलो. खेळत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.क्रिकेटसह इतरही खेळांच्या स्पर्धेचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. आयोजकांनी यापुढेही असे नवे उपक्रम नागरिकांसाठी घेऊन यावेत, असं जयंत पाटील यावेळी म्हणले.

मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका राखीताई जाधव यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले होते.


 
 
 

Comments


bottom of page