top of page

अल-कायदाचा म्होरक्या अल- जवाहिरी ठार; अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा

मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ree

९/११ हल्ल्यामध्ये जवाहिरीने समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवाहिरीच्या डोक्यावर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती.

जवाहिरी काबुलमधील निवासस्थानाच्या बाल्कनीत असताना रविवारी, ३१ जुलैला सकाळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला, त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला.असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. घरामध्ये जवाहिरीचं कुटुंबदेखील होतं. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. “कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार,” असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे.



 
 
 

Comments


bottom of page