top of page

'जवाद' चक्रीवादळ धडकणार; अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 24 तासांत 'जवाद' चक्रिवादळ उद्या सकाळी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. "जवाद" चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना ५ डिसेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ree

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जवाद चक्रीवादळामुळे उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम, हावडा हुगळी, नादियासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. समुद्रकिनाऱ्यांजवळ राहणाऱ्या मच्छिमारांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page