top of page

.... बातमी समजताच जॅकी श्रॉफ थेट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या साधेपणासाठे ओळखले जातात. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. हिंदी फिल्म अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या घरी घरकाम करणाऱ्या दीपाली तुपे या तरुणीची आजी तान्हाबाई ठाकर यांचं काही दिवसांपूर्वी वृद्धपकाळाने निधन झाले.

दीपालीच्या आजीचे निधन झाल्याची बातमी समजल्यावर ठाकर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी थेट पुण्याजवळील मावळ तालुक्यातील पवनानगर गाठले.

यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या साधेपणाचं रूप मावळवासीयांना पहायला मिळाले. यावेळी जॅकी श्रॉफ हे थेट जमिनीवर बसले आणि परिवाराची विचारपूस करत सांत्वन केले.

जॅकी श्रॉफ यांच्या या प्रेमामुळे ठाकर कुटुंबीय काही क्षण आपलं दुःख विसरून गेले होते.

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पवनानगर येथील ठाकर परिवाराला दिलेल्या भेटीमुळे भारावून गेले होते. यावेळी त्यांची साधी राहणी सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली.

 
 
 

Comments


bottom of page