top of page

'बीबीसी'च्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी

काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन्स ’ प्रदर्शित केला होता. दोन भागांच्या या माहितपटावर देशभरातून तिखट प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात असतानाच आता बीबीसीच्या दिल्ली व मुंबई मधील कार्यालयावर आयकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. या कारवाईचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आयकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार,दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर आयकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. तसेच दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले असून कार्यालयातून कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

दिल्लीसोबतच मुंबई बीकेसी येथील बीबीसी कार्यालयातही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झालं आहे. या कार्यालयात बाहेरील व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली नाही. सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आयकरची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे.

गुजरातमधील २००२ च्या दंगलींवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेला माहितीपट म्हणजे निव्वळ "दुप्रप्रचाराचा हिस्सा" आहे, अशा शब्दांत भारत सरकारने डॉक्युमेंट्रीवर ताशेरे ओढले होते. तसेच बीबीसीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.


 
 
 

Comments


bottom of page