top of page

जर मी लोकप्रिय आहे तर ती माझी चूक नाही ...; फोटो व्हायरल

मुंबई : बिग बॉस १४ ची स्पर्धक निक्की तांबोळी पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. निक्कीने ब्रालेस फोटोशूट केले आहे. हा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करत निकीने म्हंटले आहे , " जर मी लोकप्रिय आहे तर ती माझी चूक नाही आणि जर तुम्हाला माझा हेवा वाटत असेल तर तो माझाही दोष नाही." निकीचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांमध्ये भलताच आवडला असून केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. निक्कीने याआधीही अनेकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे.

निक्की तांबोळीने हे फोटोशूट एका मॅगझिनच्या कव्हरसाठी केले आहे. त्यात तिने लाईम यलो फॉर्मल कोट पँटमध्ये दिसू शकते. पण या ओपन कोटमध्ये तिने ब्रालेस लूकमध्ये पोज दिली आहे. तिच्या आउटफिटला संपूर्ण लुक देत तिने गोल्डन कानातले आणि गोल्डन हील्स निवडल्या आहेत. तिच्या या फोटोला एका दिवसात ३ लाखाहून अधिक लाईक्स ( likes) मिळाल्या आहेत.

निकीने पारंपरिक पोशाखही फॅशनेबल पद्धतीने सादर केले आहेत. यामध्ये तिचा स्टायलिश लुक आणि मेकअप तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो. निकीला बिग बॉस 14 मधून लोकप्रियता मिळाली. शोमध्ये तिचा बिनधास्तपणा सर्वांनाच आवडला होता. त्यानंतर निक्की नंतर खतरों के खिलाडीमध्ये दिसली.



 
 
 

Comments


bottom of page