top of page

IPL Auction 2022 : ईशान ठरला सर्वात महागडा खेळाडू

आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आयपीएल मेगा ऑक्शनची प्रक्रिया सुरु आहे. आज ( शनिवारी) महालिलावाच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

ree

सर्वात महागडे खेळाडू

  • ईशान किशन – १५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)

  • दीपक चहर – १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)

  • श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)

  • शार्दुल ठाकूर – १०.७५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)

  • वनिंदू हसरंगा – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

  • निकोलस पूरन – १०.७५ कोटी (सनरायझर्स हैदराबाद)

  • हर्षल पटेल – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)


मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page