top of page

IPL 2021 : उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून; पहा IPL 2021 चे सविस्तर वेळापत्रक

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा कधी सुरु होणार याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. आज बीबीसीआयनं आयपीएलचे उर्वरित सामने यूएईत १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार असल्याचं जाहीर केलं असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या संघात खेळविला जाणार आहे. अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे,

ree

आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. मात्र संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४वे सत्र ४ मे रोजी ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्‍या स्थानावर आहे. मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.



 
 
 

Comments


bottom of page