top of page

आयपीएलवर कोरोनाचं संकट!

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आयपीएललाही आता कोरोनाचा फटका बसला असून कोलकाताच्या दोन खेळाडूंना तर चेन्नई संघाच्या तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ree

चाचणीच्या तिसऱ्या फेरीत वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतर सर्व संघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोन्ही संघांना इतर खेळाडूंपासून वेगळं विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मेडिकल टीम सतत त्यांच्या संपर्कात असून आरोग्याची माहिती घेत आहे. दरम्यान संघातील इतर अजून कोणाला कोरोनाची लागण झालेली आहे का यासाठी कोलकाताकडून चाचणी करण्यात येत आहे,अशी माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर बीसीसीआयकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


 
 
 

Comments


bottom of page