top of page

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा: नवे वेळापत्रक जाहीर

ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे, भारताचा हा दौरा यापूर्वी १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे,


भारत या दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, भारत २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये हा सामना होणार आहे. दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार असून तिसरा कसोटी सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

ree

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारी रोजी पार्ल येथे, दुसरा सामना पार्ल येथे आणि तिसरा आणि अंतिम केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.



कसोटी मालिका
पहिली कसोटी – २६-३० डिसेंबर, सेंच्युरियन
दुसरी कसोटी – ०३-०७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी – ११-१५ जानेवारी, केपटाऊन

एकदिवसीय मालिका
पहिली वनडे – १९ जानेवारी, पार्ल
दुसरी वनडे – २१ जानेवारी, पार्ल
तिसरी वनडे – २३ जानेवारी, केपटाऊन

 
 
 

Comments


bottom of page