top of page

इंदुरीकर महाराज यांच्या कारचा अपघात

जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या अपघातात इंदुरीकर महाराज यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

ree

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची ट्रॅक्टरशी धडक बसली. यात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परतूरचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


 
 
 

Comments


bottom of page