top of page

मनसेच्या इशाऱ्यानंतर ICICI बँकेने केली चुकीची दुरुस्ती

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेची नेहमी आक्रमक भूमिका असते. पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा समोर आला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर ICICI बॅंकेने गुजराती भाषा बदलून मराठी भाषेत फलक लावून आपली चूक दुरुस्त केली असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत दिली.


"मुंबई,महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे गुजराती नाही हे आय.सी.आय.सी.बॅंकेला मनसे_इशाऱ्यानंतर कळलं , ICICI बँकेने मराठी भाषा’समाविष्ट करून आपली चुक दुरूस्त केली." असं ट्विट करत चित्रे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

" महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, गुजराती नाही. चुकून झालं असल्यास त्वरित चुक सुधरवा अन्यथा... विसरू नका" असं ट्विट करत इशारा अखिल चित्रे यांनी काही दिवसांपूर्वी ICICI बँकेला दिला होता.


यापुर्वी देखील मनसेने दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या होत्या. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती. आता पुन्हा एकदा मनसेने मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे. गेल्या वर्षी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश केला.




Comments


bottom of page