top of page

ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न; चाकू हल्ला... मॅनेजरचा मृत्यू तर कॅशियर जखमी

Updated: Jul 30, 2021

वसई: विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँक लुटण्याचा प्रयत्न झाला बँकेच्या माजी व्यवस्थपकानेच बँक लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने केलेल्या चाकू हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला तर कॅशिअर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ree

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील आयसीआयसीआय बँक गुरुवारी संध्याकाळी बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. बँकेत कॅशिअर श्वेता देवरूख (32) आणि व्यवस्थापंक योगिता वर्तक (34) या दोघीच होत्या. रात्री 8 च्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केल्यानंतर दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगीता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. हल्ला करून पाळणाऱ्या आरोपी दुबे याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

 
 
 

Comments


bottom of page