top of page

१२वी रसायनशास्त्राचा पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत दिलं आहे.

ree

“विले पार्लेमधील एका केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवरती १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आढळली होती. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर वाटप झाल्यानंतर आढळली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोर्डाने केलेल्या चौकशीनुसार, पेपर वाटप केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये आढळली होती. मात्र पेपर फुटलेला नाही, हा प्रकार गंभीर आहे, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून सखोल चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.



 
 
 

Comments


bottom of page