top of page

हार्दिक पंड्याकडून ५ कोटींची घड्याळं जप्त

मुबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पंड्याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमधून डच्चू देण्यात आलाय. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत पंड्याकडून ५ कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. हार्दीक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. तेथून परतत असताना मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केली.


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मायदेशी परतल्यानंतर कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पंड्याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिलं ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page