top of page

किल्ल्यावरून पाय घसरला ... ;तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ दरीत अडकले

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ ते दरीत अडकून पडले होते.. त्यानंतर आता या वृद्ध व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्यात आले. हनुमंत जाधव असं दरीत पडून जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. ते ६४ वर्षांचे असून ते शुक्रवारी संध्याकाळी दरीत पडले होते.

हनुमंत जाधव हे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी म्हणून अजिंक्यतारा किल्ल्यावर गेले होते. हनुमंत जाधव यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळले. संपूर्ण रात्र आणि १२ तासाहून अधिक काळ ते दरीत अडकून पडले होते. शनिवारी सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने संबंधित व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिक पोलीस आणि बचाब पथकाच्या मदतीने रोप टाकून दरीत अडकलेल्या हनुमंत जाधव यांना वाचवण्यात आलं.


 
 
 

Comments


bottom of page