top of page

'मोदीं'बद्दलच उद्योगपती हर्ष गोएंका यांचं 'ते' ट्वीट व्हायरल!

Updated: Jul 18, 2022

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत मार्मिक ट्वीट केलं आहे.गोएंका यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर भलतंच व्हायरल होताना दिसत आहे.

ree

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांनी ललित मोदी आणि सुष्मिता सेनप्रकरणी केलेले ट्वीट्स खूप व्हायरल झाले होते. काल (शनिवारी) त्यांनी तीन मोदीबद्दल एक मार्मिक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा फोटो देखील वापरला आहे.

“एका मोदींना इंडिया हवा आहे. दुसऱ्या मोदीला ‘मिस इंडिया’ हवी आहे आणि तिसरा मोदी इंडियात हवा आहे.” गोएंका यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर भलतंच व्हायरल होतं आहे. आतापर्यंत या ट्वीटला साडेसहा हजाराहून अधिक लाइक मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट ही केल्या आहेत.

दरम्यान, ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हर्ष गोएंका यांनी भन्नाट ट्वीट केलं होतं. “मी ललितला फोन केला आणि विचारलं की तुला हे कसं जमलं? तो मला ‘सेन’सेशनल उत्तर देत म्हणाला, “मोदी है तो मुमकिन है.” हर्ष गोयंका यांचं हे ट्वीटही व्हायरल झाले होते.


 
 
 

Comments


bottom of page