top of page

...काँग्रेसला धक्का; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा

या वर्षअखेरीस गुजरात विधासभा निवडणूक होत असून सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या असतानाच काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी आज अखेर काँग्रेस पक्षाच्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे. तसेच ते पत्र ट्विट करत आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.

ree

गुजरात विधानसभा निवडणुकीआधी हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कॉंग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. तेव्हा पासून पटेल हे कधी पक्ष सोडणार का?, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

आज सकाळी हार्दिक पटेल यांनी ट्विट करत "आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असं म्हंटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामाची स्तुती करत हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षावर सार्वजनिक टीका केली होती. काही दिवसांपासून ते कॉंग्रेसच्या नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत होते.





 
 
 

Comments


bottom of page