top of page

'त्या' घड्याळांबाबत हार्दिक पंड्याने केला खुलासा

अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. रविवारी रात्री पंड्याच्या ताब्यातून दोन महागडी जप्त केली असे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता हार्दिक पंड्याने स्वतः याबाबत खुलासा करत 'त्या' घड्याळाची किंमत ५ कोटी नाही तर १.५ कोटी रुपये असल्याचे सांगितले.

ree

हार्दिक पंड्याने ट्विटरवर यांदर्भात ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर हार्दिक पंड्यावर झालेल्या कारवाईबाबत त्याने खुलासा केला आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम्सबद्दल माझ्याबाबत सोशल मीडियावर गैरसमज आहेत आणि काय झाले ते मी स्पष्ट करू इच्छितो. असे हार्दिक पंड्याने म्हटले आहे.

“मी दुबईमधून कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या सर्व वस्तू मी स्वेच्छेने घोषित केल्या होत्या आणि जे काही शुल्क भरावे लागेल ते भरण्यास तयार होतो. खरं तर, सीमाशुल्क विभागाने शुल्काचे योग्य मूल्यांकन केले आहे जे मी भरण्याचे आधीच निश्चित केले आहे. घड्याळाची किंमत ५ कोटी नाही तर १.५ कोटी रुपये आहे,” असे पंड्याने म्हटले आहे. मी देशाचा कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळाले आहे आणि मी त्यांना माझ्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे आणि त्यांना हे प्रकरण मिटवण्यासाठी जे काही वैध कागदपत्रे लागतील ते पुरवीन. कोणतीही कायदेशीर मर्यादा ओलांडण्याचे माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत,” असे हार्दिक पंड्याने म्हटले आहे.


Comments


bottom of page