top of page

रुग्णालयाला आग ! १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णालयातील दुर्घटना ताज्या असताना आता गुजरातमधील कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या भरूच परिसरातील पटेल वेलफेअर रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर देखील बनवण्यात आलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

ree

पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं असून या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाचे ट्रस्टी झुबेर पटेल यांनी दिली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 
 
 

Comments


bottom of page