top of page

भिंतीत १० कोटींची रोकड अन् १९ किलो चांदीच्या विटा; GST विभागाची मुंबईत मोठी कारवाई


ree

मुंबई : जीएसटी चोरीच्या अनेक घटना समोर येत असतानाच राज्य जीएसटी विभागाने मुंबईतील झवेरी बाजारमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भिंतीत १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा लपवल्याचे उघड झाले. यानंतर राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९-२० मध्ये २२.८३ कोटी रुपये होती. ती २०२०-२१ मध्ये ६५२ कोटी आणि २०२१-२२ मध्ये १७६४ कोटी रुपयांवर गेली. ही उलाढाल संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. दरम्यान या कारवाईत कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किंमतीच्या १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने ही जागा सीलबंद केली असून प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page