top of page

भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल...

नांदेड: आरोग्य विभागाच्या नोकर भरती परीक्षेवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गोपीचंद पडळकर हे प्रचारासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

ree

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.सुभाषजी साबणे यांच्या प्रचारार्थ कारेगाव, बळेगाव, करडखेल, मरखेल, टाकळी, धनगरवाडी, क्षीरसमुद्र, बेंबरा, बिजलवाडी, कावळगाव येथील ग्रामस्थांशी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच वझर व मानूर येथील आयोजित जाहीर सभेस संबोधित केले.


 
 
 

Comments


bottom of page