top of page

कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकारचा दिलासा

कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नोकरी गमावलेल्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचे योगदान सरकार जमा करणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी आहे, अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली आहे.

ree

उत्तर प्रदेशात मिशन शक्ती कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक विकासाचा विचार करून अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारची जन धन योजना, मुद्रा कर्ज फक्त सर्व महिलांसाठी केंद्रित आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. यावेळी त्यांनी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला.


“कोरोना काळात नोकरी गमावल्यानंतर, औपचारिक क्षेत्रातील छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी पुन्हा बोलावलेलेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसेच, या योजनेत फक्त तेच लोक समाविष्ट होतील ज्यांची कंपनी EPFO ​​मध्ये नोंदणीकृत आहे.”, असंही अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page