top of page

... आणि राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत भाषण आटोपतं घेतलं

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार गदारोळ ..

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षेनुसार वादळी सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला. आमदारांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं.

ree

आज राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात केल्यानंतर सभागृहामध्ये मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिल्या. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपलं भाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं.


 
 
 

Comments


bottom of page