top of page

गुगल क्रोम वापरत असाल तर इकडे लक्ष द्या; केंद्र सरकारने दिला इशारा

नवी दिल्ली: इंटरनेटचा वापर करणारे बहुसंख्य युजर्स गुगल क्रोम हा इंटरनेट ब्राउझर गुगल क्रोमचा वापर करतात. या ब्राउझरमध्ये तांत्रिकदृष्ट्या काही धोके निर्माण झाले असून यामुळे हॅकर्सकडून या ब्राउझरमार्फत कोणाच्याही कम्प्युटरवर हल्ला होण्याचा धोका आहे, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) दिला आहे.

ree

CERT-In ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं लिहिलं आहे, की 'गुगल क्रोम या इंटरनेट ब्राउझरमध्ये सुरक्षाविषयक 22 तांत्रिक धोके आढळले आहेत. गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करत असलेल्या युजर्सच्या कम्प्युटरवरचा पर्सनल डेटा सायबर हॅकर्सच्या हाती लागू शकतो, तसंच कम्प्युटरमध्ये मालवेअरही पसरवलं जाऊ शकतं.या बाबी लक्षात घेऊन गुगल क्रोम युझर्सनी क्रोमची ही लेटेस्ट व्हर्जन लवकरात लवकर इन्स्टॉल करावी आणि तीच वापरावी, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page