top of page

Tokyo Olympic :नीरज चोप्रानं इतिहास घडवला; भालाफेक स्पर्धेत जिंकले सुवर्ण पदक ! (Video)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिकले आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत ७ पदके जिंकून सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे पहिले ऑलिम्पिक आहे. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.

ree

१२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

अ‍ॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने आज सुवर्ण पदक जिंकून १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.


भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page