top of page

‘गोकुळ’ च्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

'गोकुळ' दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नाहीतर राज्याचे लक्ष लागले होते. अनेक राजकीय घडामोडींनंतर विश्वास पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोकुळमधील महाडिकांची तीन दशतकांची सत्ता उलथून लावत सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

ree

अध्यक्षपदी विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यापैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात गुरुवारी प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही एकमत झाले नव्हते. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी पुन्हा बैठक झाली आणि अखेर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बंद लिफाफ्यातून आलेल्या नावाचे बैठकीत वाचन झाले. त्यानंतर अध्यक्षपदाची माळ विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडली असून त्यांचा कार्यकाल मे २०२३ पर्यंत असेल, नमूद केले होते.


गोकुळच्या दमदार, गुणात्मक वाटचालीसाठी राजकारण बाजूला ठेवून विरोधकांसह सर्वांनाच कारभारात सामावून घेतले जईल. दूध उत्पादकांना प्रती लिटर दोन रुपयांची वाढ, जादा परतावा यासह अन्य आश्वासनांची पूर्तता केली जाईल. निवडणुकीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे विश्वास पाटील यावेळी बोलताना म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page