top of page

Video : नवऱ्यासोबत भांडण; महिलेने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

Updated: Jul 17, 2021

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर एका महिलेने ९ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ree

एका उंच इमारतीच्या बाहेरुन शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये इमारतीच्या नवव्या मजल्याच्या बाल्कनीच्या बाहेर सदर महिला लटकताना दिसत आहे. तर एका व्यक्तीने तिचा हात पकडून ठेवला आहे. काही वेळानंतर हात धरुन राहिल्यानंतर या व्यक्तीची पकड सैल होते. व्हिडीओमध्ये बल्कनीमधून लटकणारी ही महिला हात सुटून खाली पडण्याआधी इमारतीमधील काही नागरिकांनी ती पडण्याची शक्यता असणाऱ्या जागी गाद्या आणून ठेवल्याने या महिलेचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झालीय.


मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे आणि तिचा हात पकडून असणाऱ्या व्यक्तीचं जोरदार भाडंण झालं त्यानंतर सदर महिलेने ९ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला पण महिलेने रेलिंगमधून उडी मारताच त्या व्यक्तीने तिचा हात धरला आणि आरडाओरडा केला. व्हिडीओमध्ये या महिलेचा हात पकडून तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती तिचा नवरा असल्याचं सांगण्यात येत आहे.

या महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडीओ एकाने ट्विट केलाय. या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आलेली नसती तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं यासंदर्भात पोलिसांनी महिलाचा हात धरुन तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे चौकशी केली आहे. सदर महिला अद्याप बेशुद्धावस्थेत असल्याने पोलिसांनी तिचा जबाब अद्याप नोंदवला नाही.


 
 
 

Comments


bottom of page