top of page

नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द

नऊ बालकांची हत्या करणाऱ्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

ree

रेणुका शिंदे, सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र प्रशासनाने ही कारवाई करण्यास दिरंगाई झाली. त्यानंतर त्या दोघी बहिणींनी अ‍ॅड्. अनिकेत वगळ यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली आहे. न्यायालयाने निकाल देताना झालेल्या अक्षम्य विलंबाबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यावेळी कोर्टाने, आरोपींचा गुन्हा माफी देण्यासारखा नाही, मात्र प्रशासनाच्या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगतिलं.


 
 
 

Comments


bottom of page