top of page

... कंत्राटदाराला कचऱ्यानं घातली अंघोळ

मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचल्यानं नालेसफाईचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेला विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहे. यावरून वाद प्रतिवाद सुरू असतानाच मुंबईतील शिवसेना आमदाराने एका कंत्राटदाराला कचऱ्यानं अघोळ घातल्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत असून असून, या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.

ree

मुंबईत तीन-चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर जास्त असल्यानं मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं होतं. व्यवस्थित नालेसफाई न केल्यानं चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे चांगलेच संतापले. तसंच रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कंत्राटदारावर कचरा टाकायला सांगितला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या अंगावर टाकला.

मागील १५ दिवसांपासून कंत्राटदाराशी संपर्क साधून रस्त्याची सफाई करण्याची विनंती करतोय. मात्र, त्याने हे काम केलंच नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता साफ करण्याचं कामं सुरू केल्यानंतर तो तिथे आला. कंत्राटदार त्याचं काम जबाबदारीनं करत नसल्यानं मी हे केलं असल्याचं चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.



 
 
 

Comments


bottom of page