top of page

Video: बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर प्रदर्शित, काही तासात 50 लाखांहून अधिक Views

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला 50 लाखांहून अधिक Views मिळाले आहेत. तर 3 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ like केला आहे

या चित्रपटात आलिया भट्ट मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगण या चित्रपटात गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत आहे. बोल्ड लुक आणि दमदार संवादांमुळे आलिया प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेताना दिसत

आहे.


गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


Comentarios


bottom of page