top of page

ऑक्सिजनचा तुटवडा; ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात

गेल्या २४ तासात २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू

ree

गेल्या २४ तासात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.


देशभरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य सेवांवर ताण पडत असून सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीमधील गंगाराम रुग्णालय हे ६७५ बेड्सचं एक नामांकित खासगी रुग्णालय आहे. मात्र तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “गेल्या २४ तासांत २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या सध्या धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे”. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 
 
 

Comments


bottom of page