top of page

पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपचे भागवत कराड महापौर झाले; गडकरींनी सांगितला किस्सा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात काल 29 जुलैला हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकारणातील विविध राजकीय किस्से सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा किस्सा सांगितला.

ree

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “डॉ. भागवत कराड हे संभाजीनगरमधील अतिशय उत्तम कार्यकर्ते. महानगरपालिकेचे महापौर होते. त्यावेळी भाजपचा महापौर होणं शक्य नव्हतं. त्यावेळी हे सगळे आले आणि मला म्हणाले बाळासाहेबांकडे फक्त तुम्हीच जा आणि बाळासाहेब तुमचं ऐकू शकतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यावेळी मी बाळासाहेबांना म्हणालो, भाजपला संधी द्या, कारण कराडसारखा चांगला माणूस महापौर होईल, अशी विनंती केली. त्यावेळी बाळासाहेबांनी आमची संख्या कमी असतानाही त्यावेळी परवानगी दिली आणि त्यांच्या आशिर्वादाने भागवत कराड महापौर झाले.


 
 
 

Comments


bottom of page