top of page

गडचिरोली जिल्ह्यात 7 कोरोनामुक्त, तर 8 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली : जिल्हयात आज 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या 71 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30558 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29744 वर पोहचली. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.23 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 8 बाधितांमध्ये गडचिरोली, वडसा आणि धानोरा तालुक्यातील प्रत्येकी 01, चामोर्शी तालुक्यातील 02 तर मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 03 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 02, चामोर्शी 01, मुलचेरा 02, कुरखेडा 01 तसेच वडसा येथील 01 जणांचा समावेश आहे.

 
 
 

Comments


bottom of page