top of page

महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं होणार मोफत लसीकरण

राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवर लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार येणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली.

ree

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरातील १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला असून १७ राज्यांनी यापूर्वीच मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, असे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार आहे, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page