top of page

Video: फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा गोंधळ; हिंसाचारात १२७ जणांचा मृत्यू

फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात १२७ जणांचा मृत्यू झाला. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे.

ree

याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. त्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला. त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या.

या दुर्घटनेत १२७ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत


 
 
 

Comments


bottom of page