top of page

लग्नाच्या जेवणातून विषबाधा, १०० हुन अधिकजण रुग्णालयात दाखल

लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात संबंधित घटना घडली आहे. विषबाधेमुळे १०० पेक्षा जास्त जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दर्गा रोड परिसरामध्ये रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक विवाह समारंभ होता. या विवाह समारंभामध्ये जेवणानंतर अवघ्या एक ते दीड तासात लग्नाला आलेल्या काही नातेवाईकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. काही जणांना चक्कर येऊ लागले. त्यामुळे लग्नातील सर्वजण घाबरले. परिसरातील डॉक्टरांना बोलवण्यात आलं. पण सर्वचजणांना त्रास होऊ लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात सगळ्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं. जेवणातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.


Comments


bottom of page