top of page

सोलापुरात भीषण आग; गाड्या, दुकानाचं साहित्य जळून खाक

सोलापूर : शहरातील रेल्वे लाईन्स परिसरातील 7th हेव्हन या सात मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार, दि २६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ही आग लागली असून या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीमुळे पार्किंग मधील अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहन, मेडिकल दुकानाचे साहित्य व इतर फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीमुळे इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.

ree

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन अधीक्षक केदार आवटे स्वतः आग नियंत्रणामध्ये सहभागी झाले होते. आगीची वार्ता शहरात पसरताच बघ्यांची एकच गर्दी झाली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या पाणी फवारणी करत होत्या, जवळपास ३ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले. आगीची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर तसेच पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे घटनास्थळी पोहोचले. उपायुक्त बांगर आणि कडूकर यांनी स्वतः गच्चीवर जाऊन तेथे थांबलेल्या वृद्ध आणि महिलांना सुरक्षित खाली आणण्यात मदत केली. दरम्यान या इमारतीत एकूण ४८ फ्लॅट असून या आगीत किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.



 
 
 

Comments


bottom of page