top of page

भंगाराच्या गोदामाला भीषण आग

वर्धा : येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

ree

गोदामात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, लाकूड फाट्यांचा मोठा साठा असल्याने आगीने उग्र रुप धारण केलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. .



 
 
 

Comments


bottom of page