top of page

झोपडपट्टीला भीषण आग,५० हून अधिक झोपड्या खाक

मुंबई येथील मालाडमध्ये एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पुर्व जामऋषी नगर मध्ये सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. या आगीत ५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.



Comments


bottom of page