top of page

राज्यात खरीप हंगामात खतांची पुरेशी उपलब्धता; अडचण आल्यास "या" नंबरवर संपर्क साधा.

महाराष्ट्र राज्याचा शेतीचा खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. रासायनिक खते ही शेतीची महत्त्वाची निविष्टा आहे. शेतक-यांची खते खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

ree

राज्यामध्ये खालील प्रमाणे खत प्रकार निहाय खत साठा आज रोजी उपलब्ध आहे.

1) युरिया - 4,18,410 मे. टन.

2) डीएपी. - 1,00,230 मे. टन.

3) एमओपी - 1,45,130 मे. टन.

4) संयुक्त खते- 7,34,790 मे. टन.

5) एसएसपी - 4,22,170 मे. टन.

राज्यात सर्वं रासायनिक खते मिळून एकत्रित 18,20,730 मे.टन. इतका खत साठा असून जुन महिन्यात खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही. केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्यात राज्याला पुरेसा खत साठा मंजूर होत असल्याने शेतक-यांनी खत उपलब्धतेची चिंता करु नये अथवा विनाकारण खताची साठेबाजी करु नये. प्रत्येक जिल्यात बियाणे, खते उपलब्धतेच्या अडचणी मांडणेसाठी मोबाईल फोन क्रमांक दिले असून राज्यस्तरावर 8446117500, 8446331750, 8446221750 आणि 18002334000 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

शेतक-यांनी विविध अडचणीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.


 
 
 

Comments


bottom of page